रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
चाकरमान्यांना घेऊन पनवेल- रत्नागिरी होळी विशेष गाडी संध्याकाळी सुटणार!
खेड, चिपळूण, सावर्डे, आरवलीसह संगमेश्वरलाही थांबा घेणार
रत्नागिरी : मुंबईकर चाकरमान्यांना होळीसाठी गावी घेऊन येणारी पनवेल ते रत्नागिरी होळी विशेष गाडी आज ( रविवारी) सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी रत्नागिरीसाठी सुटणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्र. 01153 पनवेल – रत्नागिरी स्पेशल पनवेल येथून 05/03/2023 आणि 08/03/2023 रोजी 18:20 वाजता सुटेल आणि ती दुसऱ्या दिवशी 00:20 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. आपल्या प्रवासात ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली तसेच संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबे घेणार आहे
ही गाडी एकूण वीस डब्यांची धावणार आहे . त्यात स्लीपर – 18 कोच, SLR – 02 असे डबे जोडले जाणार आहेत.