रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
जामनगर-तिरूनेलवेली एक्सप्रेसला उद्यापासून स्लीपरचा अतिरिक्त कोच
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या जामनगर ते तिरूनेर्वेली एक्सप्रेसला उद्या दिनांक 28 एप्रिलपासून जाणाऱ्या तसेच येणाऱ्या प्रत्येकी दोन फेऱ्यांसाठी जादा डबा जोडण्यात येणार आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 19578 जामनगर ते तिरूनेलवेली या एक्सप्रेसला दिनांक 28 व 29 एप्रिल 2023 रोजी तर तिरुनेलवेली ते जामनगर 19577 या गाडीला दिनांक एक व दोन मे रोजी च्या फेऱ्यांसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी झाल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.