नेत्रावती, मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर थांब्यासंदर्भात कोकण रेल्वेचे ठोकळेबाज उत्तर!
‘आपके प्रस्ताव पर विचार करने हेतु प्रस्ताव बेलापूर अग्रेषित किया’
रत्नागिरी : नेत्रावती मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यासंदर्भातील प्रलंबित मागणीसंदर्भात कोकण रेल्वेच्या आर. आर. एम. कार्यालयात संगमेश्वरवासीय प्रवाशांच्या वतीने निवेदन दिल्यानंतर कोकण रेल्वेने नेहमीप्रमाणे आंदोलन कर्त्यांना ठोकळेबाज उत्तर पाठवले आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात संगमेश्वरवासीय प्रवासी जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर सोशल मीडिया ग्रुप च्या वतीने दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी मागील काही वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील क्षेत्रीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.
त्यानंतर दोन दिवसांनी आमच्या दिनांक 21 डिसेंबर रोजी २०२२ जी कोकण रेल्वेने नेहमीप्रमाणे आंदोलनाचा इशारा देणाऱ्या संदेश जिमन यांना ‘आपका पत्र उचित कार्यवाही के लिए बेलापूर कार्यालय को अग्रेषीत किया गया है’, असे साचेबद्ध पत्र पाठवून दिनांक 26 जानेवारी 2023 रोजीच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
कोकण रेल्वेने नेहमीप्रमाणे साचेबद्ध उत्तर पाठवले आहे. मात्र उग्र आंदोलन करूनच कोकण रेल्वे प्रशासनाला जाग येणार असेल तर आम्ही या गाड्यांना थांबा मिळेपर्यंत आमच्या आंदोलनावर ठाम आहोत.
– श्री. संदेश जिमन, निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर
ग्रुप.
कोकण रेल्वे आंदोलनकर्त्यांना उत्तरादाखल पाठवलेल्या पत्राची प्रत कोकण रेल्वेने दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच संगमेश्वर तहसीलदारांना देखील पाठवली आहे.