रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
पनवेल येथून आज रात्री कोकण रेल्वे रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते पनवेल मार्गावर दि. २९ जानेवारी २०२३ रोजी रिटर्न्ड स्पेशल गाडी सकाळी सोडण्यात आली आहे.
संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०१४०३० ही विशेष ट्रेन रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी मडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुटली असून पनवेलला ते त्याच दिवशी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१४२९) पनवेल येथून दि. २९ जानेवारी रोजी रात्री ९ वा. १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगावला ती सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
आपल्या प्रवासात ही विशेष ट्रेन करमाळी, थिवी, सावंतवाडी कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर चिपळूण, खेड, माणगाव तसेच रोहा स्थानकावर थांबे घेणार आहे.