मडगाव-पनवेल मार्गावर रविवारी धावणार विशेष गाडी!
खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरीसह राजापूर रोडला थांबणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते पनवेल मार्गावर दि. २९ जानेवारी २०२३ रोजी रिटर्न्ड स्पेशल गाडी धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ०१४०३० ही विशेष ट्रेन रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी मडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि पनवेलला ते त्याच दिवशी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१४२९) पनवेल येथून दि. २९ जानेवारी रोजी रात्री ९ वा. १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगावला ती सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
आपल्या प्रवासात हे विशेष ट्रेन करमाळी, थिवी, सावंतवाडी कुडाळ, कणकवली वैभववाडी राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर चिपळूण, खेड, माणगाव तसेच रोहा स्थानकावर थांबे घेणार आहेत.
एकूण १७ एल एच बी कोचसह ही गाडी धावणार आहे. यामध्ये फर्स्ट एसी + टू टायर एसी एक, टू टायर एसी एक कोच, थ्री टायर एसी दोन कोच, स्लीपर श्रेणीची सात कोच, सेकंड सीटिंग श्रेणीचे चार कोच, एस एल आर एक जनरेटर कार्ड एक याप्रमाणे डब्यांची रचना असेल.