मुंबई-कन्याकुमारी एक्सप्रेसला खेड थांबा न मिळाल्यास आंदोलन
खेड : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या खेड रेल्वे स्थानकात थांबत नसल्याने अनेकवेळा या स्थानकावर अवलंबून असलेल्या प्रवासी वर्गाला संघर्ष करावा लागत आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला खेड थांबा देण्यात आलेले नाही. या विरोधात जल फाउंडेशन संस्थेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने खेड रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा मिळावा, यासाठी प्रयत्न करत असताना देखील मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत चालवण्यात येणारी स्पेशल गाडी आणि या गाडीला खेड थांब मिळाला नाही.
भविष्यात ही गाडी कायमस्वरूपी सुरू झाली तर खेड रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मिळाला पाहिजे.
अन्यथा खेड रेल्वे स्थानकावर आंदोलन केले जाईल.
याचा कोकण रेल्वेने तातडीने विचार करावा; अन्यथा संघर्ष अटळ आहे.
–नीतीन जाधव, जल फाऊंडेशन खेड