शेगाव-कोकण जोडणाऱ्या थेट रेल्वे गाडीचा पर्याय उद्यापासून उपलब्ध
मडगाव-नागपूर एक्सप्रेसने शुक्रवारपासून शेगावला जाता येणार
रत्नागिरी : विदर्भ-शेगाव- कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर-मडगाव सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगावला जाणार्या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे. या आधी कोकणातून शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी थेट गाडीचा पर्याय नसल्याने भाविकांना मुंबई मार्गे जावे लागत असे.
विदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची ‘विदर्भ पंढरी’ म्हणून ओळख आहे. गजानन महाराज संस्थानकडून देण्यात येणार्या सोयी-सुविधा, शिस्त, पारदर्शी कारभार यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी राहते. राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक शेगांवला येतात.त्यात विदर्भ कोकण जोडणाऱ्या नागपूर-मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
नागपूर-मडगाव (01139) एक्सप्रेसचे वेळापत्रक
शेगाव – 19.25 ( बुधवार व शनिवार )
नाशिक रोड – 00.58
पनवेल – 05.35
खेड- 08.08
चिपळूण – 08.36
संगमेश्वर – 09.12
रत्नागिरी – 10.05
राजापूर – 11.10
मडगाव -नागपूर (01140) एक्सप्रेसचे वेळापत्रक ( सोमवार व शुक्रवार )
राजापूर रोड – 23.20
रत्नागिरी- 00.30
संगमेश्वर – 01.20
चिपळूण – 02.00
खेड -02.30
पनवेल – 07.00
नाशिक रोड – 11.08
शेगाव -15.35
कोकण तसेच शेगाव थेट रेल्वे सेवेसी जोडणाऱ्या या गाडीला नागपूर -मडगाव मार्गावर धावताना दिनांक 4 जानेवारीपासून थांबा मंजूर झाला आहे. यानुसार प्रत्यक्षात कोकणातून शेगाव/नागपूरकडेकडे धावताना या गाडीने प्रत्यक्षात दिनांक ६ जानेवारी २०२३ पासून आठवड्यातील शेगावच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.