होळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून दिलासा
कोकण रेल्वे मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांना डबे वाढवले
रत्नागिरी : कोकणात होळीसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्ग लावणारे हापा मडगाव तसेच पोरबंदर कोच वेळी या दोन एक्सप्रेस गाड्यांना होळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार (22 908 / 22 907 ) हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला दिनांक 1 मार्चसाठी तर मडगाव ते हापा दरम्यान धावणाऱ्या फेरीला दिनांक 3 मार्च 2023 साठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 2 मार्चसाठी तर या गाडीच्या परतीच्या प्रवासात (20909) म्हणजे कोच वेळी ते पोरबंदर या फेरीसाठी दिनांक 5 मार्च रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे