रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखीन दोन विशेष गाड्या

रत्नागिरी : होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर गुजरात मधून उधना तसेच अहमदाबाद येथून देखील दोन विशेष गाड्या जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच पनवेल येथून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या होळी स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आले आहेत.

यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. स्पेशल फेअर द्वि-साप्ताहिक विशेष चालवली जाणार आहे.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. विशेष भाड्यावर द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून 01/03/2023 आणि 05/03/2023 रोजी 20:00 वाजता सुटेल आणि ती मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी 19:40 वाजतापोहोचेल.

गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. मंगळुरु जंक्शन येथून द्वि-साप्ताहिक स्पेशल स्पेशल फेअरसह 21:10 वाजता, 02/03/2023 आणि 06/03/2023 रोजी सुटेल आणि उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी 21:05 वाजता पोहोचेल.

ही गाडी आपल्या प्रवासात वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी एकूण 22 डब्यांची एलएचबी असेल

होळीसाठी जाहीर केलेली दुसरी विशेष गाडी क्र. 09412 अहमदाबाद जं. – करमाळी सुपरफास्ट / ०९४११ करमाळी – अहमदाबाद जं. विशेष भाड्यावर विशेष (साप्ताहिक) पद्धतीने चालवली जाईल.

यामध्ये गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद जं. – करमाळी सुपरफास्ट स्पेशल गाडी अहमदाबाद जंक्शन येथून मंगळवार, 07/03/2023 रोजी सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.२५ वाजता करमाळीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९४११ करमाळी – अहमदाबाद जं. विशेष भाडे (साप्ताहिक) बुधवार, 08/03/2023 रोजी करमाळी येथून 09.20 वाजता सुटेल आणि अहमदाबाद जंक्शनला दुसऱ्या दिवशी 07:00 वाजता पोचेल.

ही गाडी वडोदरा जंक्शन, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्टेशनवर थांबणार आहे

ही गाडी एकूण 24 कोचसह धावणार आहे. या गाडीला 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 12 कोच, जनरल – 05 डबे, SLR – 02 अशी रचना असेल.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button