रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
होळीसाठी सुरत -करमाळी विशेष गाडी धावणार!
सुरत ते करमाळी दरम्यान धावणार
रत्नागिरी : होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर सुरत ते करमाळी अशी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सुरतवरून ही गाडी 09193) दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांसाठी आणि दुसऱ्या दिवशी गोळ्या करमाळीला ती दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (09194) करमाळी येथून दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता ती गुजरातमध्ये सुरतला पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी स्थानकावर थांबे घेणार आहे.