रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
Konkan Railway | अजमेर-एर्नाकुलम एक्सप्रेस उद्यापासून विजेवर धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे जाणारी अजमे- एर्नाकुलम एक्सप्रेस दिनांक ५ रोजीच्या अजमेर येथील प्रस्थानापासून विद्युत इंजिनसह धावणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण गेल्याच वर्षी पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या मालगाड्या सुरुवातीला विद्युत इंजिनसह चालवण्यात आल्या. त्यापाठोपाठ प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनचा जोडून चालवल्या जात आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणारी अजमेर ते एर्नाकुलम (12978) ही गाडी दिनांक 5 मे पासून तर परतीच्या प्रवासातील एरणाकुलम ते अजमेर अशी धावणारी गाडी (12977) तिच्या दिनांक 7 मे 2023 रोजीच्या फेरी पासून डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनसह धावेल.