महाराष्ट्रलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोडतर्फे विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवाई सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ उलवे नोड तर्फे कोपर तलाव शेजारी (शिवाई मैदान), प्लॉट नंबर ९३, सेक्टर ९, उलवे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाचे नवरात्रौत्सवचे तिसरे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नवरात्रोत्सव निमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर, हळदी कुंकू समारंभ,वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. दररोज रात्री गरबा दांडियाला मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती लाभत आहे.

विविध स्पर्धा उपक्रमाचे नागरिकांनी, भाविक भक्तांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले. चांगल्या उपक्रमाचे, कार्यक्रमाचे आयोजन केल्याने नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले.सदर मंडळाला माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी भेट दिली.देवीचे दर्शन घेउन मनोहरशेठ भोईर यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.

हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना व अंगीकृत संघटना उलवे नोड, गव्हाण विभागच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.मंडळाचे सल्लागार व उलवे शहर प्रमुख गौरव म्हात्रे, अध्यक्ष अशोक घरत, उपाध्यक्ष निलेश पाटील, उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव शान पाटील, उपसचिव विकास खंडागळे, उपसचिव सुयोग कोळी, खजिनदार श्रीधर पाटील, सहखजिनदार प्रतीक घरत, सदस्य हन्नान पाटणकर, राजेश सिंघ, नीलेश म्हादे, नावेद कपाडी, शेखर पाटील, हितेश सिंघ, राजेंद्र म्हात्रे, असिफ शेख, विनायक वाकचौरे , सम्राट घरत, अनिल घरत, आवर्षण कोळी आदी मंडळाचे पदाधिकारी सदस्य विविध स्पर्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button