- हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत मुद्दा उपस्थित
- मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मांडला मुद्दा
नागपूर : गेली अनेक वर्षे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न असलेला मलपी बोटींच्या आक्रमणाचा प्रश्न नागपूर येथे सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मालवण -कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी उपस्थित केला.
कोकणातील मच्छीमारांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार नीलेश राणे म्हणाले की, बाजूच्या कर्नाटक राज्यातून येणारे ट्रॉलर्स कश्याप्रकारे आमच्या कोकण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांना त्रास देतात. परराज्यातील ट्रॉलर्सच्या बंदोबस्तासाठी समुद्रातील गस्त वाढविण्यासोबत मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर गंभीर दखल घेण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
