सहावीतील विद्यार्थी गौरांग कुवेसकरने बनविला सुंदर किल्ला!

Team RatnagiriLive
1 Min Read

संगमेश्वर : ज्ञानदीप विद्यालय बोरजमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरांग कुवेसकर या विद्यार्थ्याने दिवाळीच्या सुट्टीत सुंदर किल्ला असून गेली सहा वर्षे तो दिवाळी सणादरम्यान किल्ला बनविण्याचा आपला छंद जोपासत आहे.

गौरांग हा अभ्यासातही हुशार असून शाळेत विविध स्पर्धेत भाग घेऊन तो सतत यश मिळवत असतो. गत वर्षी तो शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आला होता. त्याला चित्रकलेची आवड असल्याने शालेय अभ्यास झाल्यानंतर तो नेहमीच चित्र रेखाटन करत असतो. गेली सहा वर्षे तो स्वतःच्याच बुध्दीने कोणत्या ठरावीक अशा गड किल्ल्याची प्रतिकृती न बनविता प्रत्येक वेळी किल्ल्यांचे नवीन आकार बनविण्यावर भर देत असतो. किल्ले बनविताना आपल्याला आपली आई मनिषा हिचे आणि आजोबा गणपत रहाटे यांचे मार्गदर्शन लाभते, असे गौरांगने सांगितले .

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment