मतदानाच्या दिवशी असणारे आठवडा बाजार पूर्णवेळ बंद

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि.१३: बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सदर विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे. मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे याकरिता हा आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment