कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कामगारांना पगारवाढ

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि ६(विठ्ठल ममताबादे ) : न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मध्यस्थिने श्री. गुरुदेव शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस (हिंदुस्तान यार्ड धुतुम) या एम टी यार्ड मधील कामगारांना ६००० रुपये पगारवाढ देण्याचा करार करण्यात आला. त्याचबरोबर या करारनाम्यानुसार कामगारांना एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोईसुविधा देण्याचे मान्य करण्यात आले. हा पगारवाढीचा करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील कार्यालयात करण्यात आला.

या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील उपस्थित होते तर व्यवस्थापनातर्फे जितेंद्र सिंग (डायरेक्टर), देवेंद्र सिंग (डायरेक्टर) तसेच कामगार प्रतिनिधी अरुण ठाकूर, करण ठाकूर, आतिश ठाकूर, सुनील ठाकूर, अक्षय ठाकूर, समीर ठाकूर, मंगेश ठाकूर आदी उपस्थित होते.

गणपती सणापूर्वी कामगारांना पगारवाढ मिळाली असल्यामुळे तसेच एक ग्रॉस सॅलरी बोनस व इतर सोईसुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment