कोकणातील मेडिकल कॉलेज संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून आढावा

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक त्यांच्या दालनामध्ये पार पडली.
यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल, व्हॅस्कोन कंपनी अत्यंत मंद गतीने बांधकाम करत असून त्यामुळे महाविद्यालय उभारण्यात विलंब होत आहे असे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न मंत्र्यांच्यासमोर मांडण्यात आले
यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास  मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक जी केसरकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment