मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगावतर्फे जागतिक मत्स्य व्यवसाय दिन साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन निमित्ताने जलजीविका या स्वयंसेवी संस्थेसोबत शिरगांव खाडी कांदळवन मध्ये जाऊन कांदळवनातील वृक्षांची आणि परिसंस्थेची माहिती घेतली. जलजीविकेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्था समजावून सांगितली.

कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, सौ. मयुरी डोंगरे- सुर्वे, श्री. सुशिल कांबळे आणि श्री. भाटकर, जलजिविका पुणे चे चिन्मय दामले, पियुषा शेलार यांनी यशस्वीरित्या केले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment