सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांकडे रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी याबाबत कार्यालयीन आदेश दिले आहेत.


सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्याकडे देण्यात आलेला होता. तथापि प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी सहायक आयुक्‍त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त श्री. कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

स्वत:च्या पदाचे काम पाहून दिलेल्या अतिरिक्त कार्यभार पदाचे कामकाज पुढील आदेश होईपर्यंत पाहण्याबाबत कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment