Konkan Railway | दादर- रत्नागिरी होळी विशेष गाडीची आज दुसरी फेरी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी  : होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दादर ते रत्नागिरी मार्गावर विशेष गाडीची दुसरी फेरी २ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. ही विशेष गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे.

होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.

डब्यांची रचना : एकूण डबे 16
सर्वसाधारण श्रेणी : 14 डबे
एसएलआर 2 डबे
विशेष गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment