नवनियुक्त न्यायाधिशांचे स्वागत

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण  (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील दिवाणी न्यायाधिश व प्रथम न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रमुख न्यायाधिश म्हणून एम.एस. काझी, सहन्यायाधिश म्हणून एस. पी. वानखडे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी श्रीमती.जे.के. टंडन व एस. खिरापते हे सहन्यायाधिश म्हणून कार्यरत आहेत. नवीन नियुक्तीमुळे उरण कोर्टात चार न्यायाधिश कामकाज चालविणार आहेत.

उरण कोर्टात जवळपास पाच ते साडेपाच हजार प्रलंबित खटले आहेत. न्यायाधीशांची नियुक्ती केल्याने हे प्रलंबित खटले आता लवकर निघाली लागण्याची शक्यता आहे. नवीन न्यायाधिशांचे स्वागत उरण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.विजय पाटील यांनी केले. सिनिअर ऍड.मोहन मोकल व ऍड. जागृती गायकवाड यांनी सहन्यायाधिशांचे स्वागत करून सर्व नवीन न्यायाधिशांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपाध्यक्ष ऍड.किशोर ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. उरण न्यायालयातले सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ वकील यावेळी उपस्थित होते. उरण तालुक्यातील जनतेचे न्यायालयीन वाद, खटले, जलदगतीने चालवून न्याय लवकर मिळावा, अशी आशा सचिव ऍड.योगेश गांगण, ऍड.निनाद नाईक,ऍड.अर्चना माळी, ऍड.अनुराग ठाकूर, ऍड.संघर्षी गायकवाड, ऍड.रोशनी बारे, ऍड.कुंदन मुंबईकर या सर्वांनी व्यक्त केली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment