जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर कांदळवन स्वच्छता अभियान

Team RatnagiriLive
1 Min Read
  • उरणमध्ये पहिल्यांदाच अशा उपक्रमांचे आयोजन

उरण दि. २१ (विठ्ठल ममताबादे ) : “स्वच्छ पर्यावरण हा मानवाचा मूलभूत अधिकार आणि ते सुदृढ राखणे हे आद्य कर्तव्य” या विचारनुसार घारापुरी बेटावर २२ मे या जागतिक स्थलांतरित पक्षी दिवसाचे औचित्य साधून सदर कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहेत.

हे अभियान सागरशक्ती, महाराष्ट्र वनविभाग, भारतीय नौदल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन आणि गव्हाण कोळीवाडा मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

उरणमध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच घेण्यात येणार आहे. २२ मे २०२५ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० वाजता या वेळेत हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त सामाजिक संस्था संघटना, पर्यावरण प्रेमी संस्था संघटनानीं सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment