खरीप हंगाम व शेती प्रक्रिये संदर्भात शासनातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Team RatnagiriLive
2 Min Read
  • आ. महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : पंचायत समिती सभागृह उरण या ठिकाणी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखालील खरीप आढावा बैठक पार पडली.

या प्रसंगी उरण  विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शेठ बालदी, गटविकास अधिकारी उरण समीर वाठारकर व नायब तहसीलदार उरण महेश पाटील, तालुका कृषी अधिकारी उरण अर्चना सुळ,श्री वणवे शास्त्रज्ञ खारभूमी संशोधन केंद्र पनवेल, मंडल कृषी अधिकारी उरण – एस डी गटकळ, कृषी पर्यवेक्षक  बी वाय धेंडे , एस व्ही लोहकरे, श्रीमती ए. डी. बुरकुल तसेच उरण तालुक्यातील  पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतशील शेतकरी व इतर शेतकरी वर्ग, तसेच PMFME मधील महिला व्यवसायिक, महिला बचत गट व कृषी सेवा केंद्रधारक, पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान व FPO चे सदस्य असे एकूण ११५ शेतकरी  उपस्थित होते.

या प्रसंगी उरण तालुक्याचे कृषी अधिकारी  अर्चना सुळ यांनी  खरीप हंगाम २०२५ सभेचे सादरीकरण व  नियोजनाचे सादरीकरण  केले .सदर प्रसंगी आमदार महेश बालदी यांनी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी ऐकून घेतल्या व मार्गदर्शन केले.  प्रकाश ठाकूर (वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार विजेते)व प्रफुल्ल खारपाटील (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते) यांनी शेतकऱ्यांच्या वतीने प्रतिनिधित्व स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी तसेच भात पिकाचे विविध वाण याबद्दल प्रदर्शन व सखोल माहिती देण्यात आली.उरण तालुक्याचे कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी आभार प्रदर्शन केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment