ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात नव्या इमारतीमधील लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून एका सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना 12 जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेने दाखवली शहरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार श्रीकांत चव्हाण (40 राहणार मद्रुप, सेवालाल नगर तालुका, जिल्हा सोलापूर) हा दापोली येथे कामानिमित्त आला आहे. तो जेसीबी चालक तसेच मजुरीचे काम दापोली शहरात व परिसरात करत असतो. 12 जून 2025 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोफत जेवणाची सुविधा असल्याने तिथे आपले दोन मुलगे राजेश श्रीकांत चव्हाण (4 वर्ष) आणि समीर श्रीकांत चव्हाण (6 वर्ष) या दोघांना घेऊन जेवण घेण्यासाठी आला होता.
श्रीकांत चव्हाण हा जेवण घेण्यासाठी मोफत जेवण मिळणाऱ्या ठिकाणी गेला आणि त्याची दोन मुले बाजूलाच असलेल्या शेडमध्ये खेळत होती. यादरम्यान समीर श्रीकांत चव्हाण हा मुलगा खेळताना दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या ठिकाणी गेला. तेथे इमारतीच्या लिफ्टसाठी खड्डे खोदून ठेवलेले होते त्यामध्ये पाणी भरलेले असल्याने तो खेळताना त्या खड्ड्यामध्ये पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.
याचदरम्यान श्रीकांत चव्हाण हा आपल्या मुलग्याला शोधत असताना या बांधकामावर कामासाठी मअसलेला जुगनू शर्मा हा लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातून पाणी काढण्यासाठी आला असताना त्याला त्या खड्ड्यामध्ये लहान मुलांच्या चपला आढळून आल्या याच दरम्यान श्रीकांत चव्हाण हा आपल्या मुलाला शोधत आहे, हे त्याला समजले त्यानंतर पाण्यात उडी घेऊन त्याने त्या लहान मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता आतमध्ये सदर बालक बुडालेलं आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच दापोली तहसीलदार बोंबे यांनी घटनास्थळी पाहणी केली तसेच दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अहिरे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले होते सदर घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button