राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आर्यन पवार याची निवड!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या शिरपेचात मानाचा तुरा!

रत्नागिरी : टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित निवड प्रक्रियेत दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील विद्यार्थी कु. आर्यन सुदेश पवार याची राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही राज्यस्तरीय स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, कळंब, धाराशिव (उस्मानाबाद) येथे दि. १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपन्न होते आहे.

आर्यनने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे शाळा व संस्थेकडून कौतुक होत आहे.
त्याला शाळेच्या क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुर्वणा देशमुख व अध्यक्ष रहीम माद्रे यांनी विशेष कौतुक केले.

त्याच्या या निवडीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा, संस्थेचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment