Konkan Railway | दादर- सावंतवाडी ‘राज्यराणी’ला ‘तुतारी एक्सप्रेस’ का म्हणतात?

Team RatnagiriLive
101 Views
1 Min Read

मुंबई : मराठी साहित्यातील आद्य क्रांतिकारक कवी कृष्णाजी केशव दामले, जे ‘केशवसुत’ या टोपणनावाने ओळखले जातात, त्यांच्या कार्याला आदराने वंदन म्हणून तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीत २२ मे २०१७ रोजी रेल्वेने तुतारी एक्सप्रेस (Tutari Express) या नावाने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडीचे नामकरण केले आहे. पूर्वी ही गाडी दादर ते सावंतवाडी या मार्गावर राज्यराणी एक्सप्रेस या नावाने ओळखली जात होती.

कवी केशवसुत यांच्या ‘तुतारी’ या सुप्रसिद्ध मराठी कवितेच्या शीर्षकावरून या गाडीला हे नाव देण्यात आले आहे. ‘तुतारी’ म्हणजे एक प्रकारचे शिंग किंवा रणशिंग, जे पूर्वीच्या काळी युद्धाची घोषणा करण्यासाठी किंवा महत्त्वाचा संदेश देण्यासाठी वाजवले जात असे. केशवसुतांनी आपल्या कवितेतून समाज परिवर्तनाची हाक दिली होती, एक नवी चेतना जागृत केली होती. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांना रेल्वेने दिलेली ही आदरांजली आहे.

२२ मे २०१७ मध्ये त्या वेळच्या राज्यराणी एक्सप्रेसचे तुतारी एक्सप्रेस असे नामकरण  केल्यानंतर सावंतवाडीहून दादर करिता सुटलेल्या या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यावेळी.


मुंबईतील दादर आणि कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी दरम्यान धावणारी ही एक्सप्रेस कोकणातील लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची जीवनवाहिनी बनली आहे. आता ही गाडी केवळ प्रवासाचे साधन राहिली नसून, मराठी साहित्यातील एका महान कवीच्या स्मृती जागृत करणारी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारी एक जिवंत वाहिनी बनली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment