युनायटेड संकुलामध्ये आद्य क्रांतिकारकांच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Team RatnagiriLive
100 Views
1 Min Read

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल,सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी मीडियम आणि प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय या तीनही विभागांमध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या रम्य सकाळी धो धो कोसळणाऱ्या पावसातही संकुलातील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षण प्रेमी राष्ट्रप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

युनायटेड च्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संचलनाने संपन्न होत असलेल्या या सोहळ्यात गद्रे इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी केलेल्या क्रांतिकारकांच्या वेशभूषा व त्या वेशभूषासह क्रांतिकारकांचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण हे होते. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, शहीद भगतसिंग, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, हुतात्मा अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा आणि क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या सर्वांच्या वेशभूषेतील शिशुविहार, प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागातील मुलं सर्व उपस्थित उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. ध्वजारोहणानंतर संकुलातील विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत प्रकार सादर केले.
या कार्यक्रमासाठी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, संकुलातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, अध्यापक – अध्यापिका , माजी विद्यार्थी शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment