रत्नागिरीत रविवारपासून पक्षी मित्र संमेलन

- पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी : वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच पक्षी मित्र संमेलन 22 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल कोहिनूर येथे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद आमदार ॲड निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, प्रधानमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव महाराष्ट्र राज्य) एम.एस.रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष मुंबई) एस.व्ही.रामाराव, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर जी. गुरुप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेत.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे हे सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.





