रत्नागिरी : भाट्ये येथील झरी विनायक मंदिराजवळ चढावावर शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर मागून येणारी कारही एसटीवर जाऊन आदळल्याने २२ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अपघातामधील सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे रत्नागिरी–पावस मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
