- कुडाळमध्ये अद्ययावत क्रीडा संकुल उभे करण्याचा व्यक्त केला मानस
रत्नागिरी : कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर रत्नागिरी मिरजोळे एमआयडीसीतील क्रीडा संकुलाची पाहणी केली. आपल्या मतदारसंघात नव्याने क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी ही पाहणी केली.
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीत कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्याचे क्रीडा संकुल उभे रहात आहे. सध्या बंदिस्त डोम, कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. सिंथेटीक रनिंग ट्रॅकचे काम सुरु आहे. अशाच पध्दतीचे अद्ययावत क्रीडा संकुल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसीत उभे करण्याच्या दृष्टीने आ. निलेश राणे यांनी रत्नागिरीत येत मिरजोळेत जाऊन क्रीडा संकुल पाहिले. सिंधुदुर्गतील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा संकुलाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यावेळी रत्नागिरीचे प्रभारी क्रीडाधिकारी विजय शिंदे, बांधकाम विभागाचे अभियंता जनक धोत्रेकर यांनी आ. निलेश राणे यांना क्रिडा संकुल फिरवून त्याची माहिती दिली.
रत्नागिरीत आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे यांच्यासह चिपळूणचे माजी नगरसेवक परिमल भोसले, प्रफुल्ल पिसे, संकेत चवंडे, राजू भाटलेकर, शिवाजी कारेकर, दिनू सावंत, तसेच रवींद्र नगरेकर, दिपक बेंद्रे, शोएब खान, नित्यानंद दळवी, संजय बने, ययाती शिवालकर, अभि कारेकर, अशोक वाडेकर, सोहम पिळणकर, नरेश बनसोडे ,निखिल शेट्ये, बाबा भोळे, पिंट्या निवाळकर, पिंट्या देसाई, कृष्णात पाटील, संदीप पावसकर, अमर शेठ, रोहित भुजबळराव, निवास वरवडेकर, अक्षय चाळके, अमृत गोरे, राहुल भाटकर, प्रवीण लिंगायत, विष्णू सकपाळ, ईबात खान यांच्यासह रत्नागिरीतील आ. निलेश राणे यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
