- रेल्वेकडून वेळापत्रक, थांबे आणि कोचची माहिती जाहीर
रत्नागिरी : रेल्वे मंत्रालयाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. जबलपूर – कोइम्बतूर एक्सप्रेस (गाडी संख्या 20160 / 20159) ही विशेष ट्रेन आता नियमित (Regularise) करण्यात आली आहे. यापूर्वी ही ट्रेन स्पेशल सर्व्हिस (02198/02197) म्हणून चालवली जात होती.
या गाड्यांच्या नियमित धावण्यामुळे कोकण रेल्वे मार्ग आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि थांबे खालीलप्रमाणे आहेत:
रेल्वेचे वेळापत्रक आणि दिवस
ही ट्रेन आठवड्यातून एकदा दोन्ही बाजूंनी धावणार आहे:
- ट्रेन क्र. 20160 जबलपूर – कोइम्बतूर एक्सप्रेस: दर शुक्रवारी रात्री 23:50 वाजता जबलपूरवरून सुटेल आणि रविवारी दुपारी 14:30 वाजता कोइम्बतूरला पोहोचेल.
- ट्रेन क्र. 20159 कोइम्बतूर – जबलपूर एक्सप्रेस: दर सोमवारी संध्याकाळी 17:05 वाजता कोइम्बतूरवरून सुटेल आणि बुधवारी सकाळी 08:45 वाजता जबलपूरला पोहोचेल.
व्यावसायिक थांबे (Commercial Stoppages)
महाराष्ट्रातील नाशिक, पनवेल, रोहा आणि संपूर्ण कोकण पट्ट्यासह या ट्रेनला खालील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:
नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, बैंदूर मूकंबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, वडाकरा, कोझिकोड मेन, तिरूर, शोरापूर, पालक्काड.
## कोचची रचना (Coach Composition)
या एक्सप्रेस ट्रेनला एकूण 24 डबे (Coaches) जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये प्रवास करता येईल:
- एसी फर्स्ट क्लास (WGFAC): 1 डबा
- एसी टू-टियर (WGACCW): 2 डबे
- एसी थ्री-टियर (WGACCN): 6 डबे
- स्लीपर क्लास (WGSCN): 9 डबे
- जनरल सेकंड क्लास (GS): 4 डबे
- लगेज/ब्रेक व्हॅन (GSLR/GSLRD): 2 डबे
