मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण, मांडकी-पालवण, दि. 30 जुलै : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘गुरुपौर्णिमा ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मानवी जीवनातील गुरुचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्व्लन करून गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी आपल्या भाषणातून गुरूंचे महत्व सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु हा त्यची आई असते. त्यानंतर विविध गुरु त्याच्या आयुष्यात येतात. शिक्षकांच्या आणि पालकांनी केलेल्या संस्कारांमुळे माणूस घडतो. विद्यार्थ्याच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच शिक्षकांचा देखील असतो.

या कार्यक्रमाला गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे उपप्राचार्य सूर्यवंशी सर, यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment