Konkan Railway | प्रतीक्षा संपली…मुंबई-सावंतवाडी नव्या एक्सप्रेसला उद्या दुपारी हिरवा झेंडा दाखवणार!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गाडीला दाखवणार हिरवा झेंडा
  • रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार

रत्नागिरी : मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार  या गाडीची उद्घाटन फेरी उद्या गुरुवारी होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकणवासियांसाठी सुरू होणाऱ्या नव्या गाडीला गुरुवारी दुपारी 12.45 वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

उद्घाटनाची विशेष ट्रेन 01001

दिनांक : 3 सप्टेंबर 2026, गुरुवार
मार्ग : CSMT ते सावंतवाडी रोड
CSMT मुंबई येथून सुटण्याची वेळ: दुपारी 12:45 वाजता

सावंतवाडी येथे आगमन: 4 सप्टेंबर पहाटे 2 वाजता. गुरुवारी उद्घाटन होणारी ही गाडी सावंतवाडीपर्यंत तेरा तास 15 मिनिटांचा प्रवास करणार आहे.

ही उद्घाटनाची ट्रेन एकेरी धावणार आहे. परतीच्या फेरीची माहिती नंतर जाहीर केली जाणार असल्यास रेल्वे कडून करण्यात आले आहे.

यानंतर 15087/15088 CSMT–Sawantwadi Road–CSMT ही दैनिक नियमित एक्सप्रेस सेवा सुरू होणार आहे. नियमित गाडीची वेळ स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment