मुंबई ते सावंतवाडी आजपासून धावणार अतिरिक्त स्पेशल

Team RatnagiriLive
2 Min Read

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वेची भेट!

  • ​गणपती उत्सवातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने घेतला निर्णय.
  • ​मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT दरम्यान धावणार विशेष गाड्या.
  • ​१९ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत.

रत्नागिरी :आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने (Konkan Railway) चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या (Central Railway) सहकार्याने मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान जादा स्पेशल गाड्या (Additional Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, या विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

गाडी क्र. ०१००९ / ०१०१० मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT स्पेशल

  • ट्रेन क्र. ०१००९ मुंबई CSMT – सावंतवाडी रोड स्पेशल:
    • ​ही गाडी १९/०९/२०२६ आणि २६/०९/२०२६ रोजी मुंबई CSMT वरून दुपारी १३:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  • ट्रेन क्र. ०१०१० सावंतवाडी रोड – मुंबई CSMT स्पेशल:
    • ​ही गाडी २०/०९/२०२६ आणि २७/०९/२०२६ रोजी सावंतवाडी रोडवरून पहाटे ०४:०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

प्रमुख थांबे (Halts):

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

गाडीची रचना (Composition):

या २२ डब्यांच्या विशेष ट्रेनमध्ये ३-टियर एसी (०२ कोच), स्लीपर (१२ कोच), जनरल (०६ कोच) आणि एसएलआर/डी (०२) डबे असतील.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment