आरवली (प्रतिनिधी) : कोंडिवरे ते आरवली असा मोटारसायकलने प्रवास करणारे जमीर युसूफ डिंगणकर (रा. कोंडिवरे, ता. संगमेश्वर) यांना आरवली येथे भरधाव कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलस्वार रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कार चालकाने थांबण्याऐवजी वेगाने वाहन पळवून नेले.
घटना पाहताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना मदत केली आणि तातडीने माखजन पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात नाकाबंदी सुरू केली.
सुदैवाने एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर कार कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून फरार वाहनाचा शोध सुरू असून लवकरच चालकाला ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जमीर डिंगणकर यांना प्रथम वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून फरार चालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आरवली येथे अपघात करून पळून जाणाऱ्याचे वाहन कॅमेऱ्यात कैद
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
