Konkan Railway | दिवाळीसाठी गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन धावणार!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी: दिवाळीच्या सणात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते तिरुअनंतपुरम दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे.

गाडीचे वेळापत्रक:

ही विशेष गाडी क्रमांक 01463 ने धावणार आहे. उद्या (५ नोव्हेंबर) मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४:०० वाजता ही ट्रेन सुटेल. कोकण रेल्वे मार्गे प्रवास करत ही गाडी रात्री ९:५५ वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.

​प्रमुख थांबे:

प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष ट्रेनला कोकण रेल्वे मार्गांवरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे:

  • ​ठाणे, पनवेल, पेण, रोहा
  • ​खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी
  • ​कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड
  • ​थिविम आणि मडगाव

​दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी ऐनवेळची धावपळ आणि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी या विशेष ट्रेनचा मोठा फायदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment