IndiaPost : टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी २७ जानेवारीला पेन्शन अदालत

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. 2  : टपाल विभागाच्या (IndiaPost) निवृत्ती वेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्याद्वारे गोवा पोस्टल क्षेत्र (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे समाविष्ठ आहेत ) यांची पोस्टल पेन्शन अदालत मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे डाकघर अधिक्षकांनी कळविले आहे.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे (CAT/Court Cases), नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही.

निवृत्तीवेतनधारक आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालय, पणजी यांच्या नावे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. ई मेल आयडी accts.goa@indiapost.gov.in. आहे. दिनांक 15 जानेवारी नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment