राजापुरात गुरुवारी मधमाशी पालन मोफत रोजगार मेळावा

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि. ९ (जिमाका) : मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 2 वाजता या वेळेत नगरवाचनालय राजापूर सभागृह, ता. राजापूर जि. रत्नागिरी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


मेळावा निःशुल्क/मोफत असून सर्वांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय रत्नागिरी द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जेलरोड रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक ०२३५२/२२२३७९ येथे संपर्क साधावा.
कोकण विभागातील जंगल व फळबाग क्षेत्र अशी वैशिष्टय़पूर्ण निसर्ग संपदा असल्याने मध उद्योगाच्या विकासाला मोठा वाव आहे. शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे शेतीपूरक मध उद्योग सुरू केल्यास वर्षाकाठी चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते. त्यामुळे कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मध उद्योग करण्यास प्रवृत्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. पात्र व्यक्ती /संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५०% अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशी संरक्षण व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment