महिला प्रवाशांना NCMC कार्ड अटीत दिलासा
रत्नागिरी, दि. ७ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC /एसटी) रत्नागिरी विभागाने
प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. सणाच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी रत्नागिरी विभागाकडून ६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत लांब व मध्यम
पल्ल्याच्या विविध मार्गांवर दररोज २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर महिला प्रवाशांसाठी सवलतीकरिता अनिवार्य करण्यात आलेल्या 'एनसीएमसी ; (NCMC) कार्डच्या अटीत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.*
मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भासह विविध मार्गांवर जादा बसेस
दिवाळी सणानिमित्त मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, धुळे, छत्रपती संभाजीनगर
यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या आणि तेथून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड
असते. ही गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी नियमित फेऱ्यांबरोबरच या २६ दैनंदिन जादा फेऱ्यांचे
नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व फेऱ्यांचे संगणकीय आरक्षण (Reservation) सुरू करण्यात आले असून
प्रवाशांना बसस्थानकावरील आरक्षण खिडकीवर, अधिकृत खाजगी एजंटमार्फत अथवा
एसटीच्या मोबाईल ॲपवरून आगाऊ तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
*जादा फेऱ्यांचा मार्ग व वेळ खालीलप्रमाणे:*
*दापोली येथून*
* दापोली ते छत्रपती संभाजीनगर (जाता: पहाटे ५.३० | येता: स. ६.३०)
* दापोली ते परळी (जाता: पहाटे ५.०० | येता: स. ६.३०)
*खेड येथून*
* खेड ते चिंचवड (जाता: दुपारी १३.३० | येता: रात्री २२.३०)
* खेड ते विरार (जाता: रात्री २०.३० | येता: रात्री २०.३०)
* खेड ते बोरीवली (जाता: दुपारी १५.०० | येता: दुपारी १५.००)
* खेड ते बोरीवली (जाता: रात्री २२.१५ | येता: रात्री २२.१५)
* खेड ते नांदेड (जाता: पहाटे ५.३० | येता: स. १०.००)
* खेड ते बीड (जाता: संध्याकाळी १८.०० | येता: दुपारी १२.३०)
*चिपळूण येथून*
* चिपळूण ते पुणे (ताम्हाणी मार्गे) (जाता: पहाटे ५.३० | येता: दुपारी १३.००)
* चिपळूण ते स्वारगेट (जाता: दुपारी १२.०० | येता: रात्री २२.००)
* चिपळूण ते ठाणे (जाता: स. ९.३० | येता: रात्री २१.३०)
* चिपळूण ते मुंबई (जाता: स. ११.३० | येता: रात्री २२.३०)
* चिपळूण ते बोरीवली (जाता: स. ९.०० | येता: रात्री २०.४५)
* चिपळूण ते बोरीवली (जाता: स. १०.३० | येता: रात्री २१.३०)
*देवरुख येथून*
* देवरुख ते स्वारगेट (चिपळूण मार्गे) (जाता: स. ९.३० | येता: रात्री २१.१५)
* देवरुख ते नाशिक (पुणे मार्गे) (जाता: स. ११.०० | येता: स. ८.३०)
*रत्नागिरी येथून*
* रत्नागिरी ते पंढरपूर (जाता: स. ६.४५ | येता: रात्री १९.३०)
* रत्नागिरी ते पंढरपूर (जाता: रात्री १९.३० | येता: स. ६.४५)
* रत्नागिरी ते पुणे (कोल्हापूर मार्गे) (जाता: पहाटे ५.१५ | येता: रात्री १९.००)
* रत्नागिरी ते पुणे (जाता: रात्री १९.०० | येता: पहाटे ५.१५)
*लांजा व राजापूर येथून*
* लांजा ते कोल्हापूर (रत्नागिरी मार्गे) (जाता: स. १०.४५ | येता: दुपारी १६.३०)
*लांजा ते धाराशिव (जाता: संध्याकाळी १७.०० | येता: दुपारी १६.००)
* लांजा ते बोरीवली (जाता: स. ६.३० | येता: पहाटे ५.००)
* राजापूर – रत्नागिरी ते कोल्हापूर (जाता: स. ७.४५ | येता: दुपारी १५.३०)
*मंडणगड येथून*
* मंडणगड ते छत्रपती संभाजीनगर (पुणे मार्गे) (जाता: स. ७.४५ | येता: स. ८.४५)
* मंडणगड ते बोरीवली (जाता: दुपारी १२.०० | येता: रात्री २०.३०)
*महिला प्रवाशांना NCMC कार्डच्या अटीत ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
एसटी महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला प्रवाशांना तिकिटातील
सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC Card) अनिवार्य केले
होते. मात्र, सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ही अनिवार्य अट शिथिल
करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबर २०२६ पासून हा निर्णय लागू करण्यात आला असून, आता
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत महिला सवलतधारक प्रवाशांना कार्डशिवायही सवलतीचा लाभ
घेता येणार आहे.
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी विभागून सुरक्षित व वेळेवर प्रवास व्हावा, यासाठी
प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून महामंडळाच्या या जादा फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन
एसटी रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
आहे.
![]()
