MSRTC | रत्नागिरी-वसई बसला अपघात; दोन प्रवासी जखमी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : समाेरुन येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. हा अपघात आज, साेमवारी सकाळच्या दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-महाड-वसई (एमएच १४, बीटी २४९८) ही गाडी साेमवारी सकाळी रत्नागिरीहून महाडकडे जाण्यासाठी निघाली हाेती. या गाडीमधून २१ प्रवासी प्रवास करत हाेते. गाडी महामार्गावरील हातखंबा येथे आली असता समाेरुन येणाऱ्या वाहनाने बसला हूल दिली. त्यामुळे चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात कलंडली. या चरातच गाडी अडकून राहिल्याने सुदैवाने माेठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातात दाेन महिला प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment