Konkan Railway | सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान रेल्वेचा 12 जानेवारी रोजी ‘मेगा ब्लॉक’

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी :  कोकण रेल्वे मार्गावर सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान दि. 12 जानेवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वेकडून हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 12 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 9.30 असा अडीच तास मेंटेन्स मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामादरम्यान या भागातून रवाना होणार्‍या एर्नाकुलम जंक्शन ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन (12617) दरम्यान धावणारी आणि दि. 11 जानेवारी 2024 रोजी मूळ ठिकाणाहून प्रवास सुरु होणारी मंगला एक्स्प्रेस मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 45 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे. याचबरोबर तिरुनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी एक्स्प्रेस (20923) दि.11 जानेवारी रोजी मूळ ठिकाणाहून प्रवास सुरु होणारी दूरपल्ल्याची एक्स्प्रेस मडगाव ते रत्नागिरी दरम्यान 1 तास 10 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment