Konkan Railway | मुंबई- सावंतवाडी नव्या दैनिक एक्सप्रेसला हिरवा झेंडा

Team RatnagiriLive
1 Min Read
  • कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीला (01001)  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आभासी पद्धतीने तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी  प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभारंभाच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून सावंतवाडी साठी रवाना केले. मध्यम प्रतिनिधींसह शेकडो कोकणवासीय यावेळी उपस्थित होते.

15087/15088 असे नेहमीच धावणाऱ्या गाडीचे क्रमांक आहेत.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते  सावंतवाडी ही नियमित गाडी धावणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गुरुवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापौर रितू तावडे यांनी शुभारंभ च्या गाडीला  दाखवला झेंडा दाखवून कोकण साठी रवाना केले.

रेल्वेगाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावांनी दररोज धावेल.

मुंबई-सावंतवाडी गाडीचे थांबे

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे , आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment