कोकण रेल्वे मार्गावरही धावणार अयोध्या दर्शन ट्रेन!

Team RatnagiriLive
1 Min Read

कोकण रेल्वे मार्गे १२ फेब्रुवारीला पहिली गाडी रवाना होणार

देशभरातील ६६ ठिकाणाहून आयआरसीटीसी मार्फत चालवणार विशेष गाड्या

मडगाव : अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन देशभरातील 66 स्थानकांवरून भाविकांना अयोध्या दर्शन घडवण्यासाठी ‘आस्था ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत. या विशेष गाड्या आयआर सी टी सी मार्फत चालवल्या जाणार आहेत. यानुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी पहिली गाडी गोव्यातील वास्को जंक्शन वरून १२ फेब्रुवारीला सुटणार आहे.

अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येऊ लागले आहे. हीच बाब लक्षात घेऊन आय आर सी टी सी मार्फत भाविकांना अयोध्येत घेऊन येण्यासाठी तसेच दर्शनानंतर त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष गाडी वास्को येथून दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी अयोध्येसाठी निघेल.

या स्थानकांवर थांबणार आस्था स्पेशल ट्रेन

मजोरडा, मडगाव, करमाळी, थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड ही गोवा तसेच महाराष्ट्रातील स्थानके घेत उत्तर प्रदेशातील अयोध्येकडे रवाना होईल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment