दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे मच्छिमार्केट मदरसा फैजाने रजा आणि फैजाने अत्तार कोकणनगर येथे 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी मदरसा फैजाने रजा येथे मिस्बाही वसीम फारुकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच कोकणनगर मदरसा फैजाने अत्तार येथे अली असगर मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते. भारतीय तिरंग्याला मानवंदना दिल्यानंतर सर्वांना जिलेबी तसेच समोसे यांचे वाटप करण्यात आले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment