जासई हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता. उरण जि. रायगड या विद्यालयात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग सर यांनी प्रमुख पाहुणे व योग प्रशिक्षक म्हात्रे एस.जी.यांचे स्वागत करून योग दिना बद्दल व योगाचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले.

या उपक्रमा अंतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात योग प्रशिक्षक म्हात्रे.एस. जी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांनी योगाची अनेक साधी सोपी आसने केली. विद्यार्थ्यांच्या समवेत सर्व शिक्षक व सेवक वर्ग सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अतुल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गताडी एस.बी. यांनी केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment