उरण एस.टी.आगारातर्फे विविध योजनांविषयी जनजागृती

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात शालेय विद्यार्थी /विदयार्थीनीसाठी सवलतीच्या दरात असणा-या विदयार्थी पास सेवा शाळा, महाविद्यालयांमध्ये देण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

अहिल्यादेवी होळकर सवलत अंतर्गत मुलींसाठी मोफत पास सेवा तसेच सवलतीच्या दरात शैक्षणिक सहल, स्काउट गाईड, एन.सी.सी. कॅम्प इत्यादी सेवांचा लाभ घेणेबाबत व सदया रा.प. महामंडळामार्फत विदयार्थी पास वितरण सेवा हि शालांत, महाविदयालय, कॉलेज, या ठिकाणी उपलब्ध होईल व याबाबत नियोजन कळविणे, जनजागृती होण्याकरीता भेट व मार्गदर्शन कार्यक्रम उरण आगार, मुंबई विभाग मार्फत उरण व पनवेल तालुका अंतर्गत आयोजन करीत आहेत. या कार्यक्रमांमध्ये शिक्षक, प्राचार्य, विदयार्थी, पालक यांचे प्रतिसाद मोठया प्रमाणात मिळत आहे.

तसेच विदयार्थीच्या शालेय महाविदयालयीन, व उच्च शिक्षणाकरीता पालक हे अत्यंत महत्व व तत्पर असल्याचे दिसुन येते. तसेच ग्रामीण भागातून विदयार्थ्यांचा उच्च शिक्षणाकरीता कल हा शहरी ठिकाणी ये जा मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे दिसुन येत आहे.

रा. प. उरण आगार, मुंबई विभाग आगार व्यवस्थापक अमोल दराडे व प्रशासकीय कर्मचारी हे, रा.प. महामंडळाची विदयार्थी पासेस सवलत योजना किफायतशीर दरात व इयत्ता बारावी पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या विदयार्थी मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना, या सवलती शांलान्त मार्गदर्शन देवून विदयार्थ्यांमार्फत सर्वसामान्य कुटूंबा पर्यंत पोहचणे प्रसार करणेकरीता प्रबोधन करीत आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment