कोकणात यायचंय? कन्फर्म तिकीट नाही? कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेसपाठोपाठ आज रात्री विशेष गाडीचा पर्याय!

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष रेल्वे गाडी शनिवार दि. २२ जून २०२४ रोजी धावणार आहे. कोकणकन्या तसेच तुतारी एक्सप्रेसमध्ये कन्फर्म तिकीट ना मिळालेल्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरणार आहे. आज शुक्रवारी रात्री  प्रवासाला निघणाऱ्याना ही गाडी 12 वाजून 20 मिनिटांनी सीएसटी जंक्शनला तर दादरला रात्री बारा वाजून 32 मिनिटांनी पकडता येईल. ठाणे स्थानकात ही गाडी रात्री एक वाजून वीस मिनिटांनी येईल.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी (01171) ( 21 जूनच्या मध्यरात्रीनंतर ) दिनांक 22 जून रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि शनिवारी ती सिंधुदुर्गात सावंतवाडी टर्मिनसला ती दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (01172) सावंतवाडी येथून शनिवार दि. २२ जून रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दि. २३ रोजी ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

एकूण १८ डब्यांच्या या विशेष गाडीला सहा डबे सर्वसाधारण श्रेणीतील ( जनरल) तर उर्वरित वातानुकूलित+एस एल आर चे असतील.

या स्थानकांवर थांबणार विशेष गाडी

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

आय आर सी टी सी या रेल्वेच्या अधिकृत आरक्षण प्रणालीनुसार दादर नंतर या गाडीचे थांबे तुतारी एक्सप्रेस प्रमाणेच आहेत. सध्या गर्दीचा हंगाम नाही. शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्या देखील संपलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेली विशेष गाडी मुंबईतून कोकणात ‘वीकेंड’ घालवण्यासाठी येणाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment