लांजात पावसामुळे नुकसान ; विद्युत शॉर्टसर्किटने घराची हानी

Team RatnagiriLive
1 Min Read

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठयासंदर्भात राष्ट्रवादीची आज महावितरण कार्यालयावर धडक

लांजा : मागील काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे लांजा तालुक्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. विजेची शॉर्ट सर्किट होऊन घराचे नुकसान झाल्याचे नोंद झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज दिनांक 25 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून आज महावितरण कार्यालयावर धडक दिली जाणार आहे.

वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठा व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लांजा वतीने मंगळवारी 25 जून रोजी पदाधिकारी व कार्यकर्ते हे महावितरण कार्यालय लांजा येथे धडक देणार आहेत.

पावसामुळे नुकसान झालेले घर.


आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी, लोकांना होणारा त्रास यातून मुक्तता मिळवण्यासाठी समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठ्या संख्येमध्ये एम महावितरण कार्यालय लांजा येथे 25 जून 2024 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment