रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे पेणच्या खाडीत मृत माशांचा खच

Team RatnagiriLive
1 Min Read
  • रासायनिक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी

उरण दि २६ ( विठ्ठल ममताबादे ) : पेण तालुक्यातील दादर खाडी येथे रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. गेले दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले आहेत. पर्यायाने पेण खारपाडा ते उरण गोवठणेपर्यंत याचा दुष्परिणाम मासेमारी करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांना बसला आहे.

सदर घटनेची गंभीर दखल घेऊन कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने नुकसान भरपाई व संबंधित रसायनी पाताळगंगा येथील रासायनिक कंपनी वर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन देताना किनारा मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी.

कोकण किनारा मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील, सेक्रेटरी दिलीप पाटील, उपाध्यक्ष जयवंत तांडेल,
कमिटी सदस्य विनोद पाटील, प्रदीप पाटील, हिरामण पाटील आदी पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment