Mumbai-Goa Highway | महामार्गावर निवळी येथे रिक्षा-ट्रक अपघात ; रिक्षातील प्रवासी जखमी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरीनजीक निवळी येथे रिक्षा तसेच ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात रिक्षामधील प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जखमीना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालकांने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या भागात मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. महामार्गाचे काम रखडलेल्या या भागात अपघातांची संख्या वाढती आहे.

अशातच सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास रिक्षा तसेच ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात रिक्षाची दुरवस्था झाली असून ट्रक घटनास्थळी कलंडला आहे.
या अपघातात रिक्षामधील जखमी झाल्याचे समजते. अपघातात जखमी झालेल्याना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचे माहिती मिळाली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment